ठाणे

आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी राजकारणात सक्रिय; आमदार निधीमधून झालेल्या विकासकामांचे केले उद्घाटन

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात उल्हासनगर शहरातील काही भाग असून या भागात गणपत गायकवाड यांच्या पाठपुराव्यानंतर पाच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड व त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केल्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे राजकीय भवितव्य सध्या अनिश्चित आहे. असे असतानाच अचानक गणपत गायकवाड यांच्या मंजूर झालेल्या विकासकामांचे उद्घाटन करण्याचा सपाटा त्यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड व भाजप कार्यकर्त्यांनी लावला आहे.

२ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास हिललाईन पोलीस ठाण्यातील आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. सध्या ते तळोजा कारागृहात असून, त्यांचा मुलगा वैभव गायकवाड हा फरार आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात उल्हासनगर शहरातील काही भाग असून या भागात गणपत गायकवाड यांच्या पाठपुराव्यानंतर पाच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या विकासकामांचे उद्घाटन गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आमदार गणपत गायकवाड यांनी पाठपुरावा केल्यानंतर ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याद्वारे २५ फेब्रुवारी रोजी रविवारी उल्हासनगर -४ येथील श्रीरामनगर परिसरात जलवाहिनी टाकणे, महादेवनगर आणि इसरदास दरबार या ठिकाणी रस्ते व अन्य कामांना मंजुरी मिळाली असून, त्याचे उद्घाटन सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले आले. सध्या या मतदारसंघात गणपत गायकवाड आणि त्यांचे प्रतिस्पर्धी महेश गायकवाड यांच्या समर्थकांद्वारे जोरदार बॅनरबाजी सुरू असून, सोशल मीडियावर देखील त्याचे प्रतिसाद उमटत आहेत.

स्थानिक भाजप नेत्यांची उद्घाटन सोहळ्याला अनुपस्थिती

एरव्ही गणपत गायकवाड यांच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांत उपस्थित राहणारे स्थानिक भाजप नेते मात्र या कार्यक्रमात अनुपस्थित राहिले. गोळीबार प्रकरणाने भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात तणावपूर्ण वातावरण असल्याने राजकीय वादापासून दूर राहण्याची भूमिका भाजपचे नेते घेत आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी