भारताचा जीडीपी २४ टक्के घटणार; वातावरण बदलाचा फटका

जगाला सध्या वातावरण बदलाचा मोठा फटका बसत आहे. वाढते तापमान, अचानक कोसळणारा पाऊस, लांबणारा हिवाळा आदी त्याचे विविध परिणाम दिसत आहेत. या वातावरण बदलाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेवर बसताना दिसत आहे.
भारताचा जीडीपी २४ टक्के घटणार; वातावरण बदलाचा फटका
Published on

नवी दिल्ली: जगाला सध्या वातावरण बदलाचा मोठा फटका बसत आहे. वाढते तापमान, अचानक कोसळणारा पाऊस, लांबणारा हिवाळा आदी त्याचे विविध परिणाम दिसत आहेत. या वातावरण बदलाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेवर बसताना दिसत आहे. या वातावरण बदलाचा मोठा फटका २०७० पर्यंत आशिया-प्रशांत क्षेत्रातील विकास दराला बसणार आहेत. त्यात भारताच्या विकास दरात २४.७ टक्के घटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आशियाई विकास बँकेने 'आशिया प्रशांत वातावरण बदल' अहवाल तयार केला आहे. या अहवालात वातावरण बदलामुळे आशिया-प्रशांत क्षेत्रात होणाऱ्या धोक्यांचा उहापोह केला आहे. अहवालात नमूद केले की, समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच उत्पादकता घटत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. कमी दरडोई उत्पन्न व कमजोर अर्थव्यवस्थांना त्याचा मोठा फटका बसेल. वातावरण बदल वेगाने वाढत राहिल्यास किनारपट्टीवरील ३० कोटी लोक अडचणीत येऊ शकतात. २०७० पर्यंत दरवर्षी अब्जावधी डॉलर्सच्या किनारपट्टीवरील संपत्तीचे नुकसान होऊ शकते.

आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसत्सुगु असाकावा म्हणाले की, वातावरण बदलांमुळे आशिया-प्रशांत क्षेत्रात चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा व पूर वाढत आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका आर्थिक आव्हाने व मानवाला भोगावा लागत आहे. या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी तातडीने व सुनियोजित पद्धतीने पावले उचलणे गरजेचे आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रातील विकसनशील देशांनी किमान खर्चात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आवश्यक त्या शिफारशीही केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in