नवी दिल्ली : इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उत्पादक कंपनी टेस्लाने गीगाफॅक्टरी बर्लिन येथे भारतासाठी उजव्या हाताच्या ड्राइव्ह कारचे उत्पादन सुरू केले आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस ही कार देशात लॉन्च शकते, असे एका वृत्तात म्हटले आहे.
यापूर्वी ब्रिटनच्या वृत्तपत्राने वृत्त दिले होते की टेस्ला या महिन्यात एक टीम भारतात पाठवेल, जी २ ते ३ अब्ज डॉलर (१६ हजार कोटी ते २५ हजार कोटी) किमतीच्या इलेक्ट्रिक कार निर्मिती प्रकल्पासाठी जागा शोधेल. मस्क यांची टीम महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांवर लक्ष केंद्रित करू शकते. केंद्र सरकारने भारताला इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीचे केंद्र बनवण्यासाठी आपल्या नवीन ईव्ही धोरणाला मंजुरी दिली आहे. नवीन धोरणामध्ये कंपन्यांनी किमान ४१५० कोटींची गुंतवणूक करण्याची तरतूद आहे आणि कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नाही. सरकारच्या नव्या धोरणामुळे टेस्लाचा भारतात कारखाना सुरू करणे सुकर होणार आहे.