लोकसभा निवडणुकांमुळे एफपीआय सावध; मे मध्ये १,१५६ कोटींची गुंतवणूक

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी सावध भूिमका घेतली आहे.
लोकसभा निवडणुकांमुळे एफपीआय सावध; मे मध्ये १,१५६ कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी सावध भूिमका घेतली आहे. त्यांनी ‘थांबा आणि पहा’ अशी भूमिका स्वीकारली आहे. मे च्या पहिल्या दोन व्यवहार सत्रांमध्ये केवळ १,१५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

मॉरिशससोबतच्या भारताच्या कर करारात बदल आणि यूएस बॉण्ड उत्पन्नात सातत्यपूर्ण वाढ या चिंतेमुळे एफपीआयने एप्रिलमध्ये रु. ८,७०० कोटी किमतीच्या समभागांची विक्री केली. त्यापूर्वी, एफपीआयने मार्चमध्ये ३५,०९८ कोटी रुपये आणि फेब्रुवारीमध्ये १,५३९ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती. मे महिन्यातील दोन व्यवहार सत्रात फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) इक्विटीमध्ये १,१५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि कर्ज बाजारातून १,७२७ कोटी काढून घेतली आहेत, असे डिपॉझिटरीजमधील आकडेवारी दर्शविते.

मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे असोसिएट डायरेक्टर - मॅनेजर रिसर्च हिमांशू श्रीवास्तव म्हणाले, भारतात सार्वत्रिक निवडणुका सुरू असताना परकीय गुंतवणूकदारांनी निवडणुकीचे निकाल येईपर्यंत ‘थांबा आणि पहा’ असा दृष्टिकोन स्वीकारला आहे.

दुसरीकडे, एफपीआयने मे महिन्यातील दोन व्यवहार सत्रात कर्ज बाजारातून १,७२७ कोटी रुपये काढून घेतले. ते काढण्यापूर्वी, परदेशी गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये १३,६०२ कोटी रुपये, फेब्रुवारीमध्ये २२,४१९ कोटी रुपये, जानेवारीमध्ये १९,८३६ कोटी रुपये गुंतवले होते. जेपी मॉर्गन इंडेक्समध्ये भारत सरकारच्या रोख्यांच्या आगामी समावेशामुळे ही आवक वाढली आहे.

मॉर्निंगस्टारचे श्रीवास्तव म्हणाले की, व्याजदरात कधी कपात होणार, या अपेक्षेने बाजारात ओघ सुरू राहील. एकूणच, २०२४ मध्ये आतापर्यंत एकूण आवक समभागांमध्ये ३,३७८ कोटी रुपये आणि कर्ज बाजारात ४३,१८२ कोटी रुपये झाली आहे.

कॉर्पोरेट निकाल, जागतिक ट्रेंडवर बाजारातील दिशा ठरेल: विश्लेषक

चौथ्या तिमाहीतील आर्थिक निकाल, जागतिक घटक आणि मॅक्रो इकॉनॉमिक डेटा या आठवड्यात शेअर बाजाराची दिशा ठरेल, असे विश्लेषकांनी सांगितले. विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका, रुपया-डॉलरचा कल आणि जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूडचे दर या मुद्यांचाही बाजारावर प्रभाव राहील.

देशांतर्गत कंपन्यांच्या-हीरो मोटोकॉर्प, लार्सन ॲण्ड टुब्रो, बीपीसीएल, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयशर मोटर्स आणि टाटा मोटर्स आदींच्या चौथ्या तिमाहीचे वित्तीय निकाल आणि पुढील टप्प्यातील मतदानावर बाजाराची स्थिती दिसेल, असे स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक प्रवेश गौर म्हणाले.

सेवा क्षेत्रासाठी पीएमआय डेटा देखील इक्विटी मार्केटमधील व्यवहारावर परिणाम करेल. मार्चमधील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी शुक्रवारी जाहीर होणार आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे रिटेल रिसर्च हेड सिद्धार्थ खेमका म्हणाले, सोमवारी बाजार यूएस रोजगार डेटा आणि डीमार्ट आणि कोटक बँकसारख्या कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीचा बाजारावर परिणाम होईल. बँक ऑफ इंग्लंडचे पतधोरण आणि युरो झोनमधील जीडीपी आकडेवारीवर बाजाराला दिशा मिळेल, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. गेल्या आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स १४७.९९ अंकांनी वाढला. एनएसई निफ्टी ५५.९ अंकांनी वाढला. सेन्सेक्स शुक्रवारी ७३२.९६ अंकांनी घसरून ७३,८७८.१५ वर, तर एनएसई निफ्टी देखील १७२.३५ अंकांनी घसरून २२,४७५.८५ वर बंद झाला.

सहा कंपन्यांच्या बाजारमूल्यात ६८,४१७ कोटींनी घट

गेल्या आठवड्यात आघाडीच्या दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य रु. ६८,४१७.१४ कोटींनी घसरले. त्याचा सर्वाधिक फटका भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला. रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इन्फोसिस, आयटीसी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांना फटका बसला तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांना लाभ झाला.

logo
marathi.freepressjournal.in