आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात कपात करणार?

देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या डिसेंबरमध्ये रेपो दरात ०.२५ बेसिस पॉइंटने घट करू शकते.
आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात कपात करणार?
Published on

मुंबई : देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या डिसेंबरमध्ये रेपो दरात ०.२५ बेसिस पॉइंटने घट करू शकते. हा रेपोदर ६.२६ टक्के होऊ शकतो. येत्या काही दिवसात महागाईचा दर मध्यम राहील.

सप्टेंबरमध्ये महागाईचा दर ५.४९ टक्के होता. तर चालू तिमाहीत महागाईचा दर ४.९ टक्के राहण्याची शक्यता आहे. जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान महागाई कमी होऊन ती ४.६ टक्के राहू शकते. त्यामुळे आरबीआय व्याजदरात कपात करू शकते.

महागाई व विकास यांच्यात आरबीआय चांगले संतुलन तयार केले आहे. येत्या तिमाहीत महागाईत घट होईल. मंदीची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे दर कपात होण्याची शक्यता मोठी वाटत आहे.

एका सर्वेक्षणानुसार, ५७ पैकी ३० अर्थशास्त्रांनी पुढील पतधोरणात व्याजदरात २५ बेसिस पॉइंटची कपात होईल, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, अन्य अर्थशास्त्रज्ञांना रेपो दरात बदल होण्याची शक्यता दिसत नाही. भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात विकास दर वाढीचा अंदाज ६.९ टक्क्यांवरून ६.७ टक्के केला आहे. २०२३-२४ मध्ये विकास दर ८.२ टक्के होता.

logo
marathi.freepressjournal.in