भव्य दिव्य साजर होणारं १००वे नाट्य संमेलन -संजय कुळकर्णी

संमेलनात मान - अपमान हे दरवर्षी आयोजकांना सांभाळावे लागतात. यावेळी मधुर वाणीचा प्रशांत दामले नाट्य परिषेदेचा अध्यक्ष असल्यामुळे यंदाच्या १००व्या संमेलनास अभूतपूर्व गर्दी होईल,
भव्य दिव्य साजर होणारं १००वे नाट्य संमेलन -संजय कुळकर्णी
PM

नाट्य संमेलनाची तारीख जाहीर झाली की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेच्या मध्यवर्ती कार्यालयात रंगकर्मींची आणि परिषदेच्या नियामक मंडळांच्या सदस्यांची वर्दळ सुरू होते. आता १००वे नाट्य संमेलन अगदी १५ दिवसांवर आलंय. त्यामुळे अध्यक्ष प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाह अजित भुरे आणि कोषाध्यक्ष सतीश लोटके कामात व्यग्र दिसताहेत. प्रशांत दामले आणि अजित भुरे प्रथमच या नाट्य संमेलनची आखणी करताहेत. त्यांच्याकडे नाट्य परिषेदची धुरा आल्यानंतर त्यांना यंदाच्या नाट्य संमेलनाचे आयोजक म्हणून भूमिका पार पाडावयाची आहे. यंदाचे संमेलन १००वे असल्यामुळे त्या दोघांवर महत्वपूर्ण जबाबदारी असणार आहे.

प्रशांतचा सर्वच ठिकाणी जनसंपर्क दांडगा असल्यामुळे यंदाच्या संमेलनाचा तो हिरोच आहे. नाट्य परिषदेच्या कार्यालयात फेरफटका मारला असता, सर्वजण कामात गढून गेले आहेत. महाराष्ट्रातील कार्यकारी मंडळातील सदस्य यांच्याशी तो आणि अजित भुरे मोबाईलवर संपर्क करताना दिसताहेत. त्यांनी महाराष्ट्रातील कार्यकारी आणि नियामक मंडळातील सदस्यांना एक एक जबाबदारी दिलेली आहे असे दिसून आले आहे. त्यांचे ते शिलेदार दिलेली जबाबदारी पार पाडतील यात शंकाच नाही.

संमेलनात मान - अपमान हे दरवर्षी आयोजकांना सांभाळावे लागतात. यावेळी मधुर वाणीचा प्रशांत दामले नाट्य परिषेदेचा अध्यक्ष असल्यामुळे यंदाच्या १००व्या संमेलनास अभूतपूर्व गर्दी होईल, असे जाणकार म्हणताना दिसत आहेत. प्रशांतचा सर्वच राजकीय पक्षांशी सोयरसुतक असल्यामुळे त्यांचीही गर्दी असेल. संमेलन ५ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. राजकीय पुढाऱ्यांची यंदाच्या संमेलनात भाषणे नसतील असे नाट्य परिषदेच्या गोतावळ्यात चर्चीले जातंय. त्याची शहानिशा संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात स्पष्ट होईल. पुण्यात ५ जानेवारी रोजी  गणेश कला क्रीडा मंडळ यंदाच्या संमेलनाचा ट्रेलर सादर  होणार असून, ६  जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे सकाळी नाट्य संमेलनाच्या प्रथेनुसार दिंडी निघणार असून, त्यानंतर १००व्या नाट्य संमेलनाचे उदघाटन होईल. त्यानंतर त्याच दिवशी ७ वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतील. ७ जानेवारी रोजी कार्यक्रमानंतर समारोप होईल. एकूण काय यंदाचे संमेलन दणक्यात साजरा होणार असून, महाराष्ट्रातील रंगकर्मिंचा भव्य दिव्य प्रतिसाद अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in