1800 किलोमीटर रानावनात भटकून रेकॉर्ड केले पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज

धनंजय धुमाळ यांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन ही कामगिरी फत्ते केली.
1800 किलोमीटर रानावनात भटकून रेकॉर्ड केले पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज

मराठी दिग्दर्शक विजय दत्त हे सध्या जी. एन. दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित 'माचीवरला बुधा' या चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटासाठी त्यांना पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज हवे आहेत. विजय दत्त यांनी त्यांचे संगीत दिग्दर्शक अलेले धनंजय धुमाळ यांना याबाबत कल्पना दिली आणि यासाठी कामाला लागायला सांगितलं. यानंतर धनंजय धुमाळ तात्काळ कामाला लागले. त्यांनी पक्ष्याचे नैसर्गित आवाज रेकॉर्ड करण्यासाठी रानावनात भटकंती करायला सुरुवात केली. यासाठी धुमाळ यांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन ही कामगिरी फत्ते केली.

विजय दत्त यांनी धनंजय धुमाळ यांना नैसर्गिक पक्ष्यांचे आवाज हवे असल्याचं सांगताच धुमाळ यांनी आपला प्रवास सुरु केला. यात लोणावळा, अर्नाळा, त्र्यंबकेश्वर आणि सातारा येथील जंगलात त्यांनी प्रवास सुरु केला. या प्रवासात त्यांनी विविध पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केले. यासाठी धुमाळ यांना 1800 किलोमीरटचा प्रवास करावा लागला. या 1800 किलोमीटरच्या प्रवासात धुमाळ यांनी 25 जीबी डेटा गोळा केला. त्यानंतर ते एडिट करुन त्यांनी हे Bird Song तयार केलं.

धुमाळ यांनी या गाण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. आपण हे गाणं ऐकलं तर लक्ष्यात येईल की यात पक्ष्यांचा नैसर्गिक आवाजाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाद्याच्या संगीताचा समावेश नाही. या गाण्यात 100 टक्के पक्ष्यांचे नैसर्गित आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. धुमाळ यांनी या प्रवासात बहुतेक आवाज हे सकाळच्या सुमारास रेकॉर्ड केलेल असल्याचं सांगितलं जात आहे. आपण देखील या उत्साही संगीताचा आनंद घ्या.

logo
marathi.freepressjournal.in