"चंद्रावर बसणारा पहिला भारतीय", महागुरुंची एक पोस्ट आणि प्रतिक्रियांचा पाऊस

अभिनेता सचिन पिळगावकर यांची 'चांद्रयान-३' बद्दल केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
"चंद्रावर बसणारा पहिला भारतीय", महागुरुंची एक पोस्ट आणि प्रतिक्रियांचा पाऊस

काल भारताची 'चांद्रयान-3' मोहीम ही यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. या कामगिरीवरून इस्रोवर जगभारातून कौतुकांचा वर्षावर होत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणे हे खुप अवघड काम आहे. पण भारताने अशक्य असणारी ही गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. भारताची हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे. भारताच्या 'चांद्रयान 3' या मोहिमेच्या चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यामुळे संपूर्ण जगभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आणि मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करून या अद्भुत कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. अशात आता मराठी अभिनेता सचिन पिळगावकर यांची 'चांद्रयान-३' बद्दल केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

सचिन पिळगावकर यांचा ऑल टाईम हिट सिनेमा म्हणून एक चित्रपट ओळखला जातो. तो म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. त्यांनी या चित्रपटातील एक खास क्षणाचा फोटो शेयर केला आहे. सचिन पिळगांवकर यांनी शेयर केलेल्या फोटोत सुप्रिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे दिसत आहेत, ज्यांनी या सिनेमात पार्वती बाईंची भुमिका साकारली होती. पार्वतीच्या डोहाळे जेवणादरम्यानच्या सीनवेळी हा फोटो काढण्यात आला होता. ज्यात ते चंद्रावर बसले आहेत.

हा फोटो सोशल मीडियावर शेयर करतांना सचिन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "चंद्रावर बसणारा पहिला भारतीय." सध्या सचिन पिळगावकर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खुपच व्हायरल झाली आहे. नेटकरी या पोस्टला भन्नाट अश्या कमेंट करत आहेत.

अनेक लोकांना या पोस्टमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण झाली आहे. तर काहींना हा सिनेमा आठवला आहे. त्यातच सचिन यांनी इस्रो आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि सिनेमाची तुलना केल्यांमुळे त्यांना काही प्रमाणात ट्रोलिंगला देखील समोरे जावं लागलं आहे.

याविषयी एकानं लिहिलं आहे की , "एक पुनरावर्ती आनंद देणारा सदाबहार चित्रपट!" तर दुसऱ्याने लिहिलयं, "अविस्मरणीय अभिनेता... लक्ष्मीकांत जी."

तर काहींनी सिनेमाबाबत लिहिलयं की, "अजरामर कलाकृती म्हणजे.. बनवाबनवी.. सलग 365 दिवस पाहिला तरी कंटाळा येणार नाही आणि ज्याला येईल तो मराठी रसिक नाही", "पार्वती धनंजय माने पहिली मराठी महिला जी चंद्रावर पोहचली होती", अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सचिन पिळगावकर यांनी शेअर केलेल्या फोटोवर आल्या आहेत.

+

logo
marathi.freepressjournal.in