'आदिपुरुष' च्या सोहळ्यासाठी ५० लाखांचे फटाके!

तिरुपतीमध्ये पार पडला शानदार ट्रेलर लाँच
'आदिपुरुष' च्या सोहळ्यासाठी ५० लाखांचे फटाके!
TWITTER

आदिपुरुष या चित्रपटाचा दिमाखदार प्री-रिलीज सोहळा नुकताच तिरुपतीमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटाचा ऍक्शन ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी प्रभास, कृती सनोन,ओम राऊत उपस्थित होते. तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर युनिव्हर्सिटी स्टेडियम मध्ये हा सोहळा पार पडला. हा चित्रपट येत्या १६ जून रोजी प्रदर्शित होत आहे.

दिग्दर्शक ओम राऊत आपल्या आदिपुरुष या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवीन रूप देण्यासाठी निश्चितच सज्ज आहेत.आदिपुरुषचा अंतिम ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांना ते खूप भावले आहे. रामायणाच्या महाकाव्यापासून प्रेरित असलेला हा VFX भरलेला चित्रपट मोठ्या पडद्यावर आणल्याबद्दल लोक ओमचे कौतुक करत आहेत. अनेकांना माहीत नसेल, पण आदिपुरुषचे चित्रीकरण ब्लू स्क्रीन स्टुडिओमध्ये झाले आहे. आणि चित्रपटातील अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं जय श्री राम हे गाणं देखील लोकप्रिय झालं आहे . या तिरुपतीमधील सोहळ्यासाठी निर्मात्यांनी खूप खर्च केला असं समजतंय.जवळपास अडीच करोड रुपये खर्च करण्यात आला अशी चर्चा आहे. या सोहळ्यात फटाके आणि आतषबाजीसाठी तब्बल ५० लाख रुपये खर्च झालेत.

१६ जून रोजी प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर आदिपुरुष हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सगळे आतुर आहेत

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in