आशिष विद्यार्थी 60 व्या वर्षी बोहल्यावर; रुपाली बरुआशी बांधली लग्नगाठ

रुपाली व आशिष यांनी कोलकाता येथे गुरुवारी (25 मे) आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले आहे
आशिष विद्यार्थी 60 व्या वर्षी बोहल्यावर; रुपाली बरुआशी बांधली लग्नगाठ

बॉलिवूडमधील सुप्रसिध्द अभिनेते आशिष विद्यार्थी हे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाह केला आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध व्हिलन अशी त्यांची ओळख आहे. रुपाली बरुआ यांच्याशी आशिष विद्यार्थी यांनी विवाह करत नव्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे.

रुपाली व आशिष यांनी कोलकाता येथे गुरुवारी (25 मे) आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले आहे. आशिष आणि रुपाली यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जवळील नातेवाईक आणि मित्रांसाठी लग्नानंतर रिसेप्शन ठेवण्यात आले असल्याची माहिती आशिष विद्यार्थी यांनी दिली आहे.

लग्नानंतर आशिष यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "रुपालीशी या वयात लग्न करणं, हे फिलिंग खूपच छान आहे. आम्ही सकाळी कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केले. संध्याकाळी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे", असे ते म्हणाले. आशिष यांनी लग्नगाठ बांधलेल्या रुपाली बरुआ या आसामच्या असुन त्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. कोलकात्यात त्यांच्या मालकीची फॅनश स्टोर आहेत. 'टाईम्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आशिष यांनी देखील बॉलिवूड, मल्याळम, तमिळ, कन्नडसह एकून 11 भाषांमध्ये अभिनय केला आहे. ते आतापर्यंत जवळपास 200 चित्रपटांमध्ये झळकले आहेत. आशिष यांनी साकारलेला व्हिलन प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलाच उतरला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in