फिल्म जगतातल्या मानाच्या ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (70th National Film Awards) घोषणा आज शुक्रवारी नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे झाली. यामध्ये 'आट्टम' या मल्ल्याळम सिनेमाने यंदाचा सर्वोत्तम राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. तर, हिंदी सिनेमांमध्ये 'गुलमोहर' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आपल्या नावे केला. तसेच, 'उंचाई' सिनेमासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' सिनेमाने बाजी मारली आहे. २००३ मध्ये आलेल्या डार्क कॉमेडी प्रकारातल्या या रहस्यपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय, कोल्हापूरचा दिग्दर्शक, निर्माता सचिन सूर्यवंशी यांच्या 'वारसा' या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपट कॅटेगरीत पुरस्कार पटकावला आहे. तर, साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ या सिनेमाने बेस्ट डॉक्यु्मेंटरी आणि बेस्ट नॅरेशन असे दोन पुरस्कार मिळवलेत.
सर्वोत्कृष्ट अभिनेता - ऋषभ शेट्टी (कांतारा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नित्या मेनन (तिरुचित्रंभलम ) आणि मानसी पारेख (कच्छ एक्सप्रेस)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - पवनराज मल्होत्रा (फौजा) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - नीना गुप्ता (उंचाई)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीपथ (मलिकप्पुरम)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - रवि वर्मम (पोन्नियिन सेल्वन 1)
सर्वोत्कृष्ट पटकथा - आनंद एकार्शी (आट्टम)
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक - अर्पिता मुखर्जी आणि राहुल चित्तेला (गुलमोहर)