७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे.
७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
Published on

नवी दिल्ली : ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे, तर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि 'मल्याळम' सुपरस्टा र मामूटी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडण्यात आले आहे. तर अभिनेत्री यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री घोषित करण्यात आले आहे. राजकुमार राव याच्या 'श्रीकांत' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळवला.

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शनिवारी येथे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे करण्यात आली. मल्याळम अभिनेता ममूटी याला 'भ्रमयुगम' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर कार्तिक आर्यनला त्याच्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

'आर्टिकल ३७०' या चित्रपटासाठी अभिनेत्री यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाच, शिवाय या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही देण्यात आला आहे, तर दुसरीकडे राजकुमार राव याच्या 'श्रीकांत' चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट' म्हणून निवडण्यात आले आहे.

विजेत्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे

  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी

  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन : नितीन जिहान चौधरी (कल्की २८९८ एडी)

  • सर्वोत्कृष्ट संकलन : आर कलाईवन्नन (अमरन)

  • सर्वोत्कृष्ट ध्वनी मुद्रण : मानस चौधरी (भूल भुलैया ३)

  • सर्वोत्कृष्ट संवाद : वेंकी अठलुरी (लकी बास्कर)

  • सर्वोत्कृष्ट पटकथा : योगेश देशपांडे (स्वरगंधर्व सुधीर फडके), बांदीरेड्डी सुकुमार (पुष्पा २)

  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : शहनाद

  • जलाल (भ्रमयुगम) सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : श्रीकांत

  • सर्वोत्कृष्ट गायिका : वेकोम विजयलक्ष्मी (एआरएम - अंगु वाना कोनिलु), अभय जोधपूरकर (घरत गणपती - नवसाची गौरी माझी)

  • सर्वोत्कृष्ट कलाकार : रिद्धिमान बॅनर्जी, टोपोमोय देब, गीताश्री चक्रवर्ती (ओन्को की कोथिन), अरुणदेव पोथुला (३५ - चिन्ना कथा काडू), आतिश एस शेट्टी (मिथ्या)

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजकुमार पेरियासामी (अमरन)

  • सर्वोत्कृष्ट पहिला चित्रपट : स्वातंत्र्यवीर सावरकर

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : आर्टिकल ३७०

  • सर्वोत्कृष्ट लघुपट : हमसफर

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in