अभिनेता मनोज बाजपेयी विषयी होती 'ही' मोठी अफवा ; स्व:ता खुलासा करत म्हणाला...

तो प्रत्येक सीन शूट करण्यापूर्वी वोडकाचा एक शॉट घेतो, अशी त्याच्याबद्दल चर्चा आहे
अभिनेता मनोज बाजपेयी विषयी होती 'ही' मोठी अफवा ; स्व:ता खुलासा करत म्हणाला...

हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता म्हणून मनोज बाजपेयी याच्याकडे बघितलं जातं. मनोज बाजपेयीने बॉलिवूडसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सध्या अभिनेता मनोज बाजपेयी याच्याबद्दल एक चर्चा रंगत आहे. तो प्रत्येक सीन शूट करण्यापूर्वी वोडकाचा एक शॉट घेतो, अशी त्याच्याबद्दल चर्चा आहे. यावर खुद्द मनोज बायपेयी याने स्पष्टीकरण दिलं आहे.

त्याने नुकताच दिलेल्या एक मुलाखतीत त्याच्याविषयी रंगणाऱ्या चर्चांबाबत मोठा खुलासा करत त्यांना पूर्णविराम दिला आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की, "मी सिनेमाचं शुटिंग करत असताना एका ज्यूनिअर मुलीने मला विचारलं, 'सर तुम्ही पीत आहात ते काय आहे?' त्यावर मी त्या मुलीला म्हणालो की 'औषध आहे..' त्यावर त्या मुलीने म्हटलं की, 'आमच्या कलाकारांच्या गृपमध्ये एक अफवा आहे की, तुम्ही प्रत्येक सीन शूट करण्यापूर्वी वोडकाचा एक शॉट घेता...' "

यावेळी या सुरु असलेल्या अफवांना पूर्णविराम देत अभिनेता मनोज बायपेयी म्हणाला की, "मुर्खांनो.. मी नेहनत करत आहे.. हे तुम्हाला दिसत नाही. तुम्ही सर्वांनी होम्योपॅथी औषधांना वोडका शॉट करुन ठेवलं आहे. अभिनयाचं रहस्य वोडका कसं असू शकतं.. " असं मनोय बायपेयी याने म्हटलं आहे. सध्या तो त्याच्या दमादार अभिनयाच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in