रणबीर कपूरवर भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा

हिंदू धर्मात वर्ज्य असलेला पदार्थ जाणूनबुजून वापरल्यानंतर या सर्वांनी अग्नी प्रज्वलित करण्याबरोबरच हिंदू देव-देवतांनाही आवाहन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रणबीर कपूरवर भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा
PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबीयाना ख्रिसमसचा महागात पडणार असल्याची शक्यता आहे. रणबीर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांविरोधात मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सनातन धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाताळनिमित्ताने कपूर कुटुंबीयांकडून केक कापला जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर बुधवारी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय दीनानाथ तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत ही तक्रार केली आहे.  या व्हिडिओमध्ये केकवर मद्य ओतली गेली आणि त्याला आग लावण्यात आली. त्यानंतर रणबीर कपूर जय माता दी असे म्हणतो. हिंदू धर्मात वर्ज्य असलेला पदार्थ जाणूनबुजून वापरल्यानंतर या सर्वांनी अग्नी प्रज्वलित करण्याबरोबरच हिंदू देव-देवतांनाही आवाहन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in