भाईंंदर : मीरारोडमध्ये अन्नपूर्णी हा चित्रपट नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्म चॅनलवर प्रसारित करून हिंदू धर्माच्या भावना दुखवल्याबद्दल आणि देवी देवतांची बदनामी करून, धर्माबद्दल बोलून, सदरील चित्रपटात लव्ह जिहाद दाखविल्याप्रकरणी भावना दुखविल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साऊथ फेमस अभिनेत्री नयनतारा यांनी अन्नपूर्णी या चित्रपटामध्ये हिंदू समाजाच्या धार्मिक भावना भडकवणारी दृश्य व विधाने वापरलले आहेत. त्यात सदर चित्रपटामध्ये अभिनेत्री हिंदू व तिचा बयफ्रेंड मुस्लिम समाजाचा दाखवलेला आहे. या चित्रपटामधील एका दृष्यामध्ये फरहान नावाचा मुस्लिम युवक हिंदू पुजारी कुटूंबातील मुलगी पूर्णि हिला मांस कापायला प्रवृत्त करण्यासाठी मुस्लिम युवक हिंदू देवी देवतां राम, लक्ष्मण, सिता हे वनवासमध्ये असताना त्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्यांनी जनावरांची शिकार करून जनावरांचे मांस शिजवून खाल्ले, असे महर्षी वाल्मिक ऋषीने रामायणामध्ये सांगितले आहे. असे दृश्य हिंदू युवतीला मुस्लिम युवक सांगताना दाखवलेले आहे.
या चित्रपटातील दृष्यांमुळे सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अनुप मुखर्जी यांच्या तक्रारीवरून 'अन्नपूर्णी' या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश कृष्णा, अभिनेत्री-नयनतारा, अभिनेता-जय साठ्याराज, निर्माता-जतीन सेठी, र रवींद्रन, व पुनीत गोयंका, तसेच झी स्टुडीओचे चिफ बिझनेस ऑफिसर शारिक पटेल, ट्रेडेन्ट आर्ट आणि नेटफ्लीक्स इंडीया हेड मोनिका शेरगी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पत्राव्दारे चित्रपट निर्मात्यांनी मागितली माफी
९ जानेवारी रोजी चित्रपटाचे सह-निर्माते, झी स्टुडीओज यांनी माफीनामा जारी केला आणि स्पष्ट केले की या चित्रपटात हिंदू आणि ब्राम्हणांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आपल्या पत्रात प्रॉडक्शन हाऊसने स्पष्ट केले की वादग्रस्त दृश्ये संपादित होईपर्यंत हा चित्रपट नेटफ्लिक्सवर परत येणार नाही.