टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'द कपिल शर्मा' मधील तीर्थानंद राव या विनोदी कलाकाराने फेसबुकवर लाईव्ह येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळेवर त्याठिकाणी पोहचून त्याला तात्काळ रुग्णालयात भरती केलं. यामुळे त्याचा जीव वाचला होता. तीर्थानंद याला या शोमध्ये ज्युनिअर नाना पाटेकर म्हणून ओळख मिळाली आहे.
तीर्थानंद याने आपल्या प्रेयसीवर गंभीर आरोप केले होते. लिव्ह इन पार्टनरमुळे आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं त्याने म्हटलं होतं. यावेळी पोलिसांनी तीर्थानंदच्या प्रेयसीला जबाब नोंदवल्यासाठी बोलावलं असता तीच उत्तर हे सर्वांना धक्का देणारं होतं. यावेळी त्याची गर्लफ्रेंड म्हणाली मरु दे त्याला, तसंही मी त्याला सोडणारच होते. असं बोलून तिने पोलिसांचा कॉल कट केला.
तिर्थानंद याने याविषयी बोलताना सांगितलं की, तो रिलेशनशिपमध्ये रहात असलेली महिलाच त्याचा छळ करते. त्याने त्याच्या या अवस्थेसाठी तिला जबाबदार धरलं आहे. तसंच त्याला जगायचं नाही, असं सांगितलं आहे. यावेळी त्याने काही दिवसापूर्वी आमची ओळख झाली होती. आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होतो. सोबत असताना समजल की तिचं चारित्र ठिक नाही. मी तिच्यापासून दूर गेलो. पण तिने मला धमक्या दिल्या. माझ्यावर केस टाकली. यामुळे मी गेली चार-पाच दिवस घरी गेलो नाही. माझ्यावर तिच्या ३-४ लाख रुपयांचं कर्ज झालं. मला फूटपाथवर दिवस काढावे लागले. यामुळे मी तणावात गेलो. याच कारणाने मी हे पाऊल उचलले. असं तीर्थानंद याने सांगितलं आहे.