सलमान खान आणि संगीता बिजलानी साथ साथ

एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दोघे हसताना आणि मजा करताना दिसत आहेत
सलमान खान आणि संगीता बिजलानी साथ साथ

सलमान खान किसी का भाई असला तरीही किसी कि जान मात्र अजूनही आहे . सलमान खानची एकेकाळची गर्लफ्रेंड संगीता बिजलानी आजही त्याला विसरली नाही. आजही हे दोघं अनेक वेळा पार्टीज मध्ये एकत्र दिसतात. त्यांची केमिस्ट्री पाहून आजही सगळे थक्क होतात.

सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी ईदच्या निमित्ताने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अनेक सितारे उपस्थित होते .तिथे संगीता बिजलानीही उपस्थित होती. सलमान- संगीताचं फार वर्षांपूर्वीच ब्रेकअप झालं असलं तरी आजही दोघांमधील मैत्री कायम आहे. त्याच पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दोघे हसताना आणि मजा करताना दिसत आहेत. सलमान खान काहीतरी बोलताना दिसत आहे आणि संगीता त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. ती त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवते. हा विडिओ समोर येताच सलमानच्या चाहत्यांनी सलमान खान ला संगीता सोबत लग्न करण्याची विनंती केली आहे. तर काहींना हि जोडी फारच गोड वाटतेय.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in