आकाश ठोसर भ्रष्टाचार विरोधातील जनजागृती वॉकेथॉनमध्ये सहभागी; मरीन ड्राईव्हवर चाहत्त्यांसोबत केल्या मनसोक्त गप्पा

मुंबईत इंडियन बँकेच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यासाठी वॉकेथॉन आयोजित करण्यात आली होती.
आकाश ठोसर भ्रष्टाचार विरोधातील जनजागृती वॉकेथॉनमध्ये सहभागी; मरीन ड्राईव्हवर चाहत्त्यांसोबत केल्या मनसोक्त गप्पा
Published on

अभिनेता आकाश ठोसर हा मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. आकाश ठोसरने आजपर्यंत अनेक चित्रपटानंमधून स्वतःच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली आहे. आकाश अभिनयासोबतच सामाजिक भान सुद्धा जपत आला आहे. आता आकाश ठोसर भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सहभाग घेणार आहे. आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी फिटनेसला जवळ करणं जसं महत्वाचं असतं, तसचं आपल्या देशाच्या आरोग्यासाठी भ्रष्टाचारापासुन दूर ठेवणं आवश्यक असल्याचं मत सैराट फेम लोकप्रिय अभिनेता आकाश ठोसर याने व्यक्तं केलं आहे.

मुंबईत इंडियन बँकेच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यासाठी वॉकेथॉन आयोजित करण्यात आली होती. यावेळी आकाश ठोसर तिथं उपस्थित होता. बँकेचे श्री. एस. एस. पी.रॉय श्री. वजाहात अली, मुख्य प्रबंधक, सरकारी व्यवसाय यांच्यासह बँक अधिकारी, कर्मचारी तसंच मुंबईकर नागरिकांसह अभिनेता आकाश ठोसर ही सहभागी झाला होता. यावेळी आकाश म्हणाला होता, "भ्रष्टाचाराविरोधात आपल्याला बोलायला हवं, छोट्या-छोट्या पावलांनीच सुरुवात होत असते, याविषयी बोललं पाहिजे. जमेल तिथ आवाज उठवला पाहिजे. फिटनेसच्या माध्यमातून केलेल्या या जनजागृतीमुळे नक्कीच फायदा होईल आणि अनेकजण सामील होतील." अगदी पहाटे पहाटे आलेल्या मुंबईकर मंडळींसोबत आकाशने मरीन ड्राईव्ह इथं मनसोक्त फोटो सेशनही केल. लवकरच बहुचर्चित 'बाल शिवाजी 'या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं आकाशन यावेळी सांगितल आहे.

logo
marathi.freepressjournal.in