माझा आगामी चित्रपट....

आमिर खानने दिलं थक्क करणारं उत्तर
माझा आगामी चित्रपट....

आमिर खानने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. निमित्त होतं कॅरी ऑन जटटा ३ च्या ट्रेलर लॉन्चचं. यावेळी आमिर खानने पत्रकारांशी संवाददेखील साधला .

आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला होता आणि तात्पर्य म्हणजे हा चित्रपट पुरता फ्लॉप झाला. यानंतर २०२३ चा मे महिना उजाडला तरीही अद्याप आमिर खानने आगामी चित्रपटाबद्दल काहीच सूतोवाच केलं नाही. त्यामुळे साहजिकच आमिर खानच्या चाहत्यांना आमिर खान आता कोणत्या भूमिकेत दिसणार आणि कोणता चित्रपट निवडणार याची उत्सुकता होती.

या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने आमिर खानला आगामी चित्रपट कोणता असा प्रश्न विचारताच आमिर खानने जे उत्तर दिलं ते ऐकून सगळेच संभ्रमात पडले.

आमिर खानला सध्या कोणताही चित्रपट स्वीकारायचा नाहीए. त्याने ब्रेक घेतलाय. हा वेळ तो त्याच्या कुटुंबियांसोबत घालवू इच्छितो. आमिर खान म्हणाला , ''सध्या मी मी कोणताच चित्रपट स्वीकारलेला नाही. मला थोडा वेळ कुटुंबियांसोबत घालवायचा आहे .नवा चित्रपट स्वीकारण्यासाठी मी भावनिक रित्या अद्याप तयार नाहीए. त्यामुळे सध्या तरी मी कोणता चित्रपट करत नाहीए. ''

आमिर खानचा हा ब्रेक किती महिन्यांनी संपणारआणि तो नवा चित्रपट कधी स्वीकारणार, हेच आता पाहायचं

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in