बिश्नोई गँगच्या नावाने आमीर खानला धमकी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याला जेलमध्ये असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींकडून धमकी देण्यात आली आहे.
बिश्नोई गँगच्या नावाने आमीर खानला धमकी
बिश्नोई गँगच्या नावाने आमीर खानला धमकी(Photo-X)
Published on

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याला जेलमध्ये असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींकडून धमकी देण्यात आली आहे. आमीर खानवर 'लव्ह जिहाद' ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करून ही धमकी दिली. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले की, पोलीस या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हॉइस क्लिपची पडताळणी करत आहेत. दरम्यान, या कथित धमकीप्रकरणी आमीर खान किंवा त्याच्या प्रतिनिधींकडून अद्याप पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

'लव्ह जिहाद'चा आरोप

एक पोलीस अधिकाऱ्याने व्हायरल क्लिपचा हवाला देत सांगितले की, ही कथित धमकी एका सोशल मीडिया पोस्ट आणि त्यासोबत जोडलेल्या व्हॉइस क्लिपद्वारे देण्यात आली आहे. आरझू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई अशी नावे सांगणाऱ्या दोन व्यक्तींनी ही क्लिप शेअर केली असून, त्यांनी स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचे सहकारी असल्याचे म्हटले आहे. आमीर खानने नुकत्याच केलेल्या गौरी स्प्राट यांच्यासोबतच्या तिसऱ्या विवाहाचा संदर्भ देत त्यांनी आमीरवर 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. तसेच अशा गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in