आमिर खानची लेक करणार ३ जानेवारीला लग्न ; कारण वाचून बसेल धक्का

इराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे हा एक फिटनेस ट्रेनर असून तो फिटनेस एक्स्पर्ट आणि कंन्सलटंट म्हणुन देखील काम करतो
आमिर खानची लेक करणार ३ जानेवारीला लग्न ; कारण वाचून बसेल धक्का

अभिनेता अमीर खान याला बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल जातं. अमीर खान हा कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मात्र तो जितका चर्चेत असतो तितकीच त्याची लेक इरा खान ही देखील चर्चेत असते. इरा खान ही सोशल मीडिया वर नेहमीच ऍक्टिव्ह असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो फॅन्स सोबत शेअर करत असते. इरा ही नेहमीच लाइम लाइट मध्ये असते आणि तिला लाइम लाइट मध्ये राहायला देखील आवडते. इराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे हा एक फिटनेस ट्रेनर असून तो फिटनेस एक्स्पर्ट आणि कंन्सलटंट म्हणुन देखील काम करतो. बऱ्याच वर्षांपासून तो इराचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम पाहत होता. त्याने केवळ इराच नव्हे तर आमिर खानला आणि सुष्मिता सेनला देखील फिटनेसचे धडे दिले आहेत.

इरा खान आणि नुपूर शिखरे हे दोघे बराच काळ एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्या दोघांनी १८ नोव्हेंबरला साखरपुडा केला. त्यांचा साखरपुड्याला अमीर खानची संपूर्ण फॅमिली देखील होती. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. इरा आणि नुपूरचे फॅन्स आता त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहते तिला बऱ्याचदा लग्नाबद्दल प्रश्न विचारत असतात.

नुकत्याच 'इ टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत इराने ती कोणत्या तारखेला लग्न करणार आणि त्याच तारखेला का करणार? काय आहे त्यामागच खास कारण? या प्रश्नांची उत्तरे इराने या मुलाखतीत दिली आहेत. लग्नाबद्दल सांगताना ती म्हणाली की, "त्या दोघांना माहित आहे की ते 3 जानेवारीला लग्न करणार आहेत. पण आजवर त्यांनी आम्ही कोणत्या वर्षी लग्न करणार आहोत. याबाबत ठरवलेल नाही." ३ जानेवारी हीच तारीख का? याबाबत सांगताना इरा म्हणाली की, "ही तारीख आमच्यासाठी खूप खास आहे. कारण, या दिवशी आम्ही पहिल्यांदा एकमेकांना किस केलं होतं" तिच्या या उत्तराने सर्वजन चकित झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in