मराठमोळ्या पद्धतीत आमिर खानच्या लेकीच्या लग्नविधींना झाली सुरुवात; 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात

कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणे जेवणाच्या टेबलवर पंगतीत एकत्र बसलेले दिसले, जिथे त्यांच्यासाठी खास महाराष्ट्रीयन मेजवानी होती.
मराठमोळ्या पद्धतीत आमिर खानच्या लेकीच्या लग्नविधींना झाली सुरुवात; 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात

बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता लागून आहे. इरा तिच्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. इराच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. मंगळवारी रात्री आमिरच्या लेकीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. त्यावेळी तिच्यामध्ये अस्सल मराठमोळा थाट दिसून आला होता.

PM
PM

इरा ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. ती 3 जानेवारीला तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. मंगळवारी प्री-वेडिंग विधींसाठी आयोजित या कार्यक्रमात आमिरची पहिली पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद देखील त्यावेळी उपस्थित होते. इराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणे जेवणाच्या टेबलवर पंगतीत एकत्र बसलेले दिसले, जिथे त्यांच्यासाठी खास महाराष्ट्रीयन मेजवानी होती. यावेळी इराने लाल रंगाची आकर्षक साडी घातली होती. कपाळावर बिंदी आणि सोनेरी झुमके तिने परिधान केले होते. इराची मैत्रीण आणि 'लिटिल थिंग्स' फेम अभिनेत्री मिथिला पालकर ही देखील या सोहळ्याला उपस्थित होती.

'फिटनेस ट्रेनिंग' देतानाच प्रेमात पडला-

इरा खानचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे हा एक प्रसिद्ध फिटनेस तज्ञ आणि सल्लागार आहे. तो आमिर खानचा ट्रेनरही असून तो इरालाही फिटनेस ट्रेनिंग देत होता. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते आहे. नुपूर हा बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा देखील ट्रेनर आहे.

logo
marathi.freepressjournal.in