आज लग्नबंधनात अडकणार आमिरची लेक इरा

बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली असून आज बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ती लग्नबंधनात अडकणार आहे
आज लग्नबंधनात अडकणार आमिरची लेक इरा

बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली असून आज बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ती लग्नबंधनात अडकणार आहे. इराच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. मराठमोळ्या पद्धतीत सर्व कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडेल. कालपासून इरा आणि नुपूरच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ आणि प्री-वेडिंग फंक्शनचे काही फोटो समोर आले आहेत. त्या दोघांनी स्वतःही काही फोटो सोशल मीडियावर टाकलेत.

कुठे पार पडणार सोहळा?

मिळालेल्या वृत्तानुसार, इरा आणि नुपूर ताज लँड्स अँड मध्ये रजिस्ट्रार मॅरेज करून दोन ते तीन दिवसानंतर राजस्थानमधील उदयपुर इथे डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरातील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये 3 जानेवारी 2024 ला संध्याकाळी 7:00 वाजता विवाहसोहळा सुरू होणार आहे. त्या दोघांच्या नवीन वर्षाची सुरुवात लग्नाआधीचे सेलिब्रेशन आणि हळदी समारंभाने झाली. मंगळवारी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित होते. १३जानेवारीला मुंबईतील फेमस जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये रिसेप्शन होणार असून त्या कार्यक्रमाला अनेक बाॅलीवुड सेलिब्रटी हजेरी लावणार आहेत.

'फिटनेस ट्रेनिंग' देतानाच प्रेमात पडला-

इरा खानचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे हा एक प्रसिद्ध फिटनेस तज्ञ आणि सल्लागार आहे. तो आमिर खानचा ट्रेनरही असून तो इरालाही फिटनेस ट्रेनिंग देत होता. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते आहे. नुपूर हा बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा देखील ट्रेनर आहे.

logo
marathi.freepressjournal.in