
नवी दिल्ली : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिने प्रसारमाध्यमांमध्ये तिच्याबद्दलची चुकीची माहिती दिल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २०२३ मध्ये, आराध्याने स्वतःला अल्पवयीन असल्याचे सांगत अशा रिपोर्टिंगवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने आराध्या बच्चनच्या आरोग्याशी संबंधित सर्व व्हिडीओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. आता, नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत, दिल्ली उच्च न्यायालयाने गुगलसह काही वेबसाईट्सना नोटीस पाठवली आहे.