संजय कुळकर्णी/ मुंबई: नाट्य संमेलन म्हटलं की कार्यकर्ते लागतात. नुसते तेवढ्याने भागत नाही, तर मनापासून काम करणारे हवेत. काहीजणांना फक्त चमकेशगिरी करण्यातच हौस असते. पण नाट्य परिषदेत अशी काही जुनी मंडळी आहेत, की ज्यांना नाट्य परिषदेबद्दल आस्था आहे, जिव्हाळा आहे आणि प्रेम आहे. त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी द्या ती ते पार पाडणारच. अशीच एक कोल्हापूरची व्यक्ती 'आनंद कुलकर्णी'. नावातच त्याच्या आनंद आहे. त्यामुळे ते कधीही चिडत नाही की, रुसून बसत नाहीत. अनेक वर्ष ते नियामक मंडळावर आहे. त्यामुळे त्यांचं सर्वांशी पटत.
प्रशांत दामले नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर यंदाचे नाट्य संमेलन होत आहे. महाराष्ट्रातून रंगकर्मी येणार आहेत. तसेच माजी नाट्य संमेलनाध्यक्ष, नियामक मंडळ सदस्य या सर्वांच्या निवास व्यवस्थेची जबाबदारी आनंद कुलकर्णी यांच्यावर आहे. त्या संबंधात त्यांच्याशी बोललो असता ते म्हणाले, "निवास व्यवस्था ही महत्वाची जबाबदारी दिली असली, तरी भाऊसाहेब भोईर जे आयोजक आहेत, ते इतक्या झापाट्याने काम करताहेत की, त्याकडे बघून मी ही सुद्धा झापटलो गेलो आहे. कोणालाही व्यवस्थेबद्दल त्रास हा होणार नाही. यंदाचं संमेलन भव्यदिव्य असल्यामुळे कामाची व्याप्ती वाढलेली आहे.' आनंद कुलकर्णी हे तंजावरला सुद्धा गेले होते. त्यांनीच नटराजाची मूर्ती सांगलीला आणली. २७ डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमाबद्दल ते म्हणाले, "देखणा असा कार्यक्रम झाला. १५० प्रेक्षक होते. मराठीतून तो झाला. बहुतांशी प्रेक्षकांना मराठी भाषा ही कळतं होती. आता नटराजाची मूर्ती पुण्याला गेली आहे."
“अशी चूक नाट्य परिषद कदापि करणार नाही”
कार्यक्रम पत्रिकेवर सांस्कृतिक संचालनालयाचे नावं नाही असं म्हटलं गेलं. पण प्रशांत दामले यांनी ते विधान खोडून टाकताना म्हटले की, "शासनाचा लोगो कार्यक्रम पत्रिकेवर आहेच. तो डावलला कसा जाईल? अशी चूक नाट्य परिषद कदापि करणार नाही", असे देखील ते म्हणाले.