अभिनेता अजाज खानच्या पत्नीला अटक; अमली पदार्थ प्रकरणात सीमाशुल्क अधिकाऱ्यांची कारवाई

अभिनेता अजात खानची पत्नी फॅलन गुलिवालाला हिला अमली पदार्थ प्रकरणात सीमाशुल्क विभागाने अटक केली आहे. जोगेश्वरी येथील त्यांच्या निवासस्थानी टाकण्यात आलेल्या छाप्यात तपास अधिकाऱ्यांना विविध अमली पदार्थ सापडल्याचे सांगण्यात आले.
अभिनेता अजाज खानच्या पत्नीला अटक; अमली पदार्थ प्रकरणात सीमाशुल्क अधिकाऱ्यांची कारवाई
Published on

मुंबई : अभिनेता अजात खानची पत्नी फॅलन गुलिवालाला हिला अमली पदार्थ प्रकरणात सीमाशुल्क विभागाने अटक केली आहे. जोगेश्वरी येथील त्यांच्या निवासस्थानी टाकण्यात आलेल्या छाप्यात तपास अधिकाऱ्यांना विविध अमली पदार्थ सापडल्याचे सांगण्यात आले.

सीमाशुल्क विभागाने खान यांच्या कार्यालयातील कर्मचारी सूरज गावड याला कुरिअरद्वारे १०० ग्रॅम मेफेड्रोन मागविल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. गावड काम करत असलेल्या खान यांच्या अंधेरी कार्यालयात अमली पदार्थाचा साठा वितरीत करण्यात आला होता. तपासादरम्यान सीमा शुल्क अधिकाऱ्यांना गुलिवाला हिच्या अमली पदार्थ तस्करीतील सहभागाबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, तपास यंत्रणांनी अभिनेत्रीच्या जोगेश्वरी येथील फ्लॅटवर छापा टाकला आणि १३० ग्रॅम गांजा व इतर प्रतिबंधित पदार्थ जप्त केले.

गुलिवाला हिला अटक केल्यानंतर अधिकाऱ्यांनी खानची चौकशी करण्याची शक्यता वर्तविली आहे. तिच्या निवासस्थानी आणि कार्यालयात मिळालेल्या अमली पदार्थांच्या माहितीसंबंधी अभिनेता खान चौकशीसाठी उपलब्ध नव्हते.

सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या मते, ऑक्टोबरमध्ये अमली पदार्थाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला. मागोवा घेताना ते खान यांच्या कार्यालयात पोहोचल्याचे दिसून आले. तपासणीदरम्यान आम्हाला पार्सलमध्ये १०० ग्रॅम अमली पदार्थ सापडले असून ते गावड यांच्या नावाने मागवले गेले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in