आता अल्लू अर्जुन दिसणार 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकासोबत

निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत केली आगामी चित्रपटाची घोषणा
आता अल्लू अर्जुन दिसणार 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकासोबत

भारतातील तीन पॉवरहाऊस - निर्माता भूषण कुमार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुन एका मोठ्या सहयोगासाठी एकत्र आले आहेत. या असोसिएशन अंतर्गत टी-सीरीज फिल्म्स प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्सद्वारे चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

अलीकडेच, निर्माता भूषण कुमार, प्रणय रेड्डी वांगा, सह-निर्माता शिव चानना, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि सुपरस्टार अल्लू अर्जुन यांनी या मोठ्या सहयोगावर मोहर लावण्यासाठी भेट घेतली. अशातच, अल्लू अर्जुन अभिनीत तसेच, टी-सीरीज फिल्म्स प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्सद्वारे निर्मित या चित्रपटाचे शूटिंग संदीप वांगा यांच्या 'स्पिरिट'चे रॅप झाल्यानंतर सुरु होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in