The Vaccine War : 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये अनुपम खेर यांची एन्ट्री

'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) ठरला अनुपम खेर यांचा ५३४वा चित्रपट
The Vaccine War : 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये अनुपम खेर यांची एन्ट्री

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर'ची (The Vaccine War) घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. तसेच, या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले असून, सिनेमातील मुख्य कलाकारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दर्शक उत्सुक आहेत. अशातच, मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अनुपम खेर आता या चित्रपटाचा भाग बनले आहेत. तसेच, 'द व्हॅक्सिन वॉर' हा त्यांचा ५३४वा चित्रपट आहे.

अलीकडेच नाना पाटेकर 'द व्हॅक्सिन वॉर'या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे निश्चित झाले असून लखनऊमध्ये ते या चित्रपटाचे शूटिंग करत होते. अशातच, अनुपम खेर देखील आता या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सामील झाले असून या दिग्गज कलाकारांना पडद्यावर एकत्र पाहणे विशेष आणि रोमांचक असेल. पल्लवी जोशी निर्मित विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर' स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यांसह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in