TMKOC: 'तारक मेहता...'च्या सेटवरून मोठी बातमी; प्रमुख कलाकाराला सेटवर झाली दुखापत

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे अभिनेता अमित भट्ट उर्फ '​​चंपक चाचा' यांना झाली सेटवर दुखापत
TMKOC: 'तारक मेहता...'च्या सेटवरून मोठी बातमी; प्रमुख कलाकाराला सेटवर झाली दुखापत

भारतीयांना प्रसिद्ध असलेली सगळ्यात जास्त काळ चालणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक पात्र हे घराघरात पोहचले आहे. आता याच मालिकेच्या सेटवरून एक मोठी बातमी आली आहे. या मालिकेतील चंपक चाचा म्हणजे अभिनेता अमित भट्ट यांचा सेटवर अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेतील एका दृश्यादरम्यान अमित भट्ट यांना पळायचं होतं. मात्र पळताना त्यांचा तोल गेला आणि ते पडले. पडल्यामुळे अमित यांना दुखापत झाली आहे. त्यांना दुखापतीनंतर डॉक्टरांनी पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मालिकेच्या निर्मात्यांनीही त्यांना आराम करण्यासाठी सुट्टी दिली आहे. अमित यांना दुखापत झाल्याने सेटवरील इतर कलाकारसुद्धा त्यांच्यासाठी काळजी व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in