मुंबई : लेखक, दिग्दर्शक व अभिनेते क्षितीज झारापकर यांचे रविवारी कर्करोगाने निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी अभिनय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. गेले अनेक महिने ते कर्करोगाने आजारी होते. तसेच त्यांचे विविध अवयव काम करत नव्हते. अखेर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. ‘गोळाबेरीज, ठेंगा, एकुलती एक, आयडियाची कल्पना’ आदी चित्रपटांतून त्यांनी काम केले आहे.