Mithilesh Chaturvedi Died : अनेक हिट चित्रपटांमध्ये आपली छाप पाडणारे अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन

या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली
Mithilesh Chaturvedi Died : अनेक हिट चित्रपटांमध्ये आपली छाप पाडणारे अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन
ANI
Published on

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे काल (३ ऑगस्ट) लखनौ येथे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराने त्रस्त होते. मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मिथिलेश यांना  श्रद्धांजली वाहिली आहे.

काय आहे आशिषची पोस्ट ?

मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "तुम्ही जगातील सर्वोत्तम पिता आहात, तुम्ही माझ्यावर जावई म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून प्रेम केले. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो." आशिषच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मिथिलेशला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर मिथिलेश त्यांच्या मूळ गावी म्हणजेच लखनऊला शिफ्ट झाले, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिथिलेश चतुर्वेदीने 'भाई भाई' चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी सत्य, ताल, फिजा, रोड, कोई मिल गया, बंटी और बबली, क्रिश, रेडी, गदर: एक प्रेम कथा, कोई मिल गया आणि गांधी माय फादर यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्कॅम 1992' या वेबसीरिजमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारली होती. कोई मिल गया आणि क्रेझी 4 मध्येही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मिथिलेश चतुर्वेदी यांनी अनेक मालिका आणि जाहिरातींमध्येही काम केले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या गुलाबो-सीताबोन या चित्रपटातही त्यांनी काम केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in