अभिनेते मुकेश खन्ना नसीरुद्दीन शाह यांच्यावर भडकले, म्हणाले...

लोक खूप चतुराईने मुस्लिमांविरोधात नफरत निर्माण करत आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं.
अभिनेते मुकेश खन्ना नसीरुद्दीन शाह यांच्यावर भडकले, म्हणाले...

बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह हे आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी आपल्या विधानांनी सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. त्यांनी केलेली विधानं सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. नसीरुद्धीन शाह यांनी म्हटलं होतं की, मी पुरस्कारांना अजिबात महत्व देत नाही. कोणत्याच अभिनेत्याला अभिनयासाठी पुरस्कार मिळत नाही तर पुरस्कार एक लॉबिंगचा परिणाम असतो. मी मागील दोन पुरस्कार घेण्यासाठी देखील गेलो नाही. इतकेच नाही तर मी माझ्या वॉशरुमच्या दाराचं हँडल म्हणून फिल्मफेअर अवार्डचा वापर करतो. जो वॉशरुमला जातो त्याला दोन वेळा पुरस्कार दिला जातो. असं ते म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यानं सर्वांना धक्का बसला होता. तसंच त्यांनी 'द केरळ स्टोरी' सिनेमाबद्दल देखील भाष्य केलं होते. याविषयी बोलताना ते म्हणाले होते की, मुस्लीमांविरोधात नफरत निर्माण करणं ही नवी फॅशन झाली आहे. लोक खूप चतुराईने मुस्लिमांविरोधात नफरत निर्माण करत आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं. हे बोलताना त्यांनी कोणाचही नाव घेतलं नव्हतं परुंतु त्यांचा रोख हा 'द केरळ स्टोरी' च्या दिशेनं होता.

नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्यांचा अभिनेते मुकेश खन्ना यांनी समाचार घेतला आहे. याबाबत बोलताना मुकेश खन्ना म्हणाले की, एवढा चांगला कलाकार असं भाष्य करेल हे नसीरुद्दीन शाह यांच्याकडूनच कळालं. हिंदूस्थानात मुस्लिम सुरक्षित नाहीत असं म्हणतात. श्रद्धा, अंकिता कांड, कानपूर येथील हनुमान मंदिरात तोडफोड, या घटना सतत घडत आहेत आणि या देशात मुस्लिम सुरक्षित नाहीत? जर कोणी सुरक्षित नसेल तर 100 कोटी हिंदू. तुम्ही कट्टर बनले आहात, जे एका अभिनेत्याला अजिबात शोभत नाही. असं मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे. याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, असंच असेल तर व्हा सहभागी लव्ह जिहादला प्रोत्साहन देणाऱ्या गँगमध्ये, विचार तु्म्हाला करायचा आहे. नाहीतर लोक तुमचे चित्रपट बघणं बंद नक्कीच करतील. देव तुम्हाला सदबुद्दी देवो.

मुकेश खन्ना यांचा हा व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. नसीरुद्दीन शाह यांनी मात्र अद्याप मुकेश खन्ना यांना कोणताही रिप्लाय केला नाही. ते नेमका काय रिप्लाय करतात हे बघणं महत्वाच ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in