अभिनेता पंकज त्रिपाठीला पितृशोक ; पंडित त्रिपाठींचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

पंडित त्रिपाठींचं निधन कोणत्या आजाराने झालं की वृद्धापकाळाने झालं, हे अजून कळू शकलेले नाही
अभिनेता पंकज त्रिपाठीला पितृशोक ;  पंडित त्रिपाठींचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता पंकज त्रिपाठीच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठींच्या वडिलांचं निधन झालं आहे. पंडित बनारस तिवारी असं पंकज त्रिपाठीच्या वडिलांच नाव होतं. त्यांचं वयाच्या ९८ वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पंकज त्रिपाठी यांचं मूळ गाव बेलसंड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या जाण्याने पंकज खूप दुःखी झाला असून. त्याच्या वडिलांचं निधन कोणत्या आजाराने झालं की, वृद्धापकाळाने झालं, हे अजून कळू शकलेले नाही. दरम्यान, पंकजच्या वडिलांच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पंकज त्रिपाठी बिहारमधील गोपालगं मधील रहिवासी आहे. करिअरच्या निमित्ताने पंकज मुंबईत राहत असताना वडील आणि आई गावात राहत होते. 'मॅशेबल' शी संवाद साधताना पंकज त्रिपाठीने एकदा सांगितले होते की, "मुलगा नक्की काय करतो, कुठे काम करतो अशा गोष्टींमध्ये पंकजच्या वडिलांना अजिबात रस नव्हता. याशिवाय आपला मुलगा चित्रपटसृष्टीत काय काम करतो हेही त्यांना माहीत नव्हतं".

पंकज त्रिपाठी यांनी एकदा मिडीयाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, "त्यांचे वडील एकदाच मुंबईत आले होते. मुंबईमधील मोठमोठी घरं आणि इमारती त्यांना मुळीच आवडत नव्हत्या. पंकज त्रिपाठी यांनी सांगितले होते की, त्यांचे वडील कधीही चित्रपटगृहात चित्रपट पाहायला गेले नाहीत. घरातही ते आपल्या मुलाचे सिनेमे टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर जर कुणी दाखवले तरच बघायचे. काही वर्षांआधी पंकज त्रिपाठीने आई आणि वडिलांसाठी टीव्ही सेट घरी लावला होता. 'ओह माय गॉड २' या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर पंकज त्रिपाठींना वयक्तिक आयुष्यातील या दुःखद घटनेला सामोरं जावं लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in