''मला माझी आठ तासांची झोप हवी आहे'' अभिनेता पंकज त्रिपाठी कामापासून ब्रेक घेणार!

''मला माझी आठ तासांची झोप हवी आहे." 'मैं अटल हूं' रिलीज झाल्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करणार
''मला माझी आठ तासांची झोप हवी आहे'' अभिनेता पंकज त्रिपाठी कामापासून ब्रेक घेणार!

'मैं अटल हूं' रिलीज झाल्यानंतर अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी कामापासून ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे. आपल्या आयुष्यातील शेवटची 20 वर्षे कामावर केंद्रित केल्यानंतर, अभिनेता पंकज त्रिपाठी आता आपला चित्रपट 'मैं अटल हूं' रिलीज झाल्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडा वेळ काढण्याचा विचार करत आहे.

एएनआयशी बोलताना त्रिपाठी म्हणाले, "जर आपण आठ तास झोपलो तर आपले शरीर 16 तासांसाठी तयार होते. माझ्या अनेक वर्षांच्या संघर्षात मी आठ तास झोपायचो. पण आता या यशाच्या वर्षांमध्ये मला हे शक्य होत नाहीये. मला त्या आठ तासांच्या झोपेची किंमत कळते. एकदा चित्रपट (मैं अटल हूं) प्रदर्शित झाला की, प्रमोशनची सर्व कामे केली जातात, मैं त्याग दूंगा. एक व्यक्ती म्हणून मी खूप दृढनिश्चयी आहे. मला माझी आठ तासांची झोप हवी आहे. मला माझ्या मेंदूला पोसायचं आहे."

तत्पूर्वी, अभिनेत्री प्रियांका चोप्राने, त्रिपाठीचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये एका मुलाखती बोलताना त्यांनी संथ आणि स्थिर जीवन जगण्याच्या मुद्दावर भाष्य केलं होतं.

त्याच्याशी सहमत होऊन प्रियांकाने "शहाणपण" असे कॅप्शन देत त्रिपाठींच्या मुलाखतीतला मुद्दा पोस्ट केला आहे.

त्रिपाठी व्यतिरिक्त, इतर अनेक स्टार्सनी अलीकडे कामातून विश्रांती घेण्याच्या निर्णयाबद्दल उघड बोलले आहेत.

2022 मध्ये अभिनेता आमिर खानने अभिनयातून ब्रेक जाहीर केला.

"मला असे वाटते की मी 35 वर्षांपासून काम करत आहे आणि मी माझ्या कामावर एकट्याने लक्ष केंद्रित केले आहे. मला असे वाटते की माझ्या जवळच्या लोकांसाठी हे योग्य नाही. मला थोडा वेळ काढावा लागेल. जवळच्या व्यक्तिंसोबत राहा आणि जीवनाचा अनुभव वेगळ्या पद्धतीने घ्या. मी पुढच्या वर्ष-दीड वर्षाची वाट पाहत आहे ज्यामध्ये मी अभिनेता म्हणून काम करणार नाही," असे आमिरने 2022 मध्ये एका कार्यक्रमात म्हंटल होतं.

2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू न शकलेल्या 'लाल सिंग चड्ढा'च्या रिलीजनंतर आमिरने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.

logo
marathi.freepressjournal.in