'हा' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता म्हणतोय, मला रोजच येते लक्षाची आठवण

नुकतंच राज्यभरात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला, मात्र यावेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने काढली दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण
'हा' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता म्हणतोय, मला रोजच येते लक्षाची आठवण

राज्यभरात नुकतंच मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी फक्त मराठीच नव्हे तर महाराष्ट्रात राहणाऱ्या काही अमराठी नेत्या, अभिनेत्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने मराठी भाषा दिनानिमित्त केलेल्या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे. तो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता म्हणजे अनिल कपूर. त्याने मराठी भाषा दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने आपल्या मराठीतील सुपरस्टार लाडका दिवंगत कलाकार लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण काढली. त्याने भावुक पोस्ट करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

अनिल कपूरने पोस्ट केली की, "महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. या दिनानिमित्त मला एका गोष्टीची आवर्जून आठवण येते, ती म्हणजे माझा मराठीतील एकुलता एक चित्रपट 'हमाल दे धमाल'ची. मी माझे सौभाग्य समजतो की, मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे याच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक कामगिरी पाहता आली. माझा मित्र लक्ष्मीकांतची मला रोजच आठवण येते," अशी भावुक पोस्ट त्याने केली. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेने मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आपली एक वेगळी छाप पाडली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in