'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय

प्रतीक हा त्याचे चित्रपट आणि खासगी आयुष्यामुळं नेहमी चर्चेत असतो.
'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय
Published on

अभिनेत्री स्मिता पाटील यांना आपल्यातून जाऊन यावर्षी 37 वर्ष पुर्ण होतील. स्मिता या त्यांच्या अभिनयानं तसंच वयक्तीक आयुष्यानं नेहमी चर्चेत राहिल्या. त्यांच्यानंतर त्यांचा एकुलता एक मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर हा देखील चर्चेत असतो. प्रतीक हा त्याचे चित्रपट आणि खासगी आयुष्यामुळं नेहमी चर्चेत असतो. आता तो एका नव्या कारणानं चर्चेत आला आहे. अभिनेता प्रतीक बब्बरनं आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानं तो चर्चेत आला आहे.

प्रतीक बब्बर यानंतर 'प्रतीक पाटील बब्बर' असं नाव लावणार आहे. त्यांनं इन्स्टाग्रासमह इतर सोशल मीडियावर अकाऊंटवर त्यांच नाव बदलल्याचं समोर आलं आहे. अभिनेता प्रतीक बब्बरनं आपलं नाव बदलण्यामागचं कारण सांगितलं आहे. माझ्या आईवडिलांच्या आणि आजी आजोबांच्या आशिर्वादानं

मी आईचं आडनाव लावण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनं सांगितलं आहे. हा निर्णय थोडा भावनिक आणि अंधश्रद्धेशी जोडलेला असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. मोठ्या पडद्यावर माझ नाव झळकेल तेव्हा आपल्या आईच्या योगदानाची मला आणि तिच्या लाखो चाहत्यांना आठवण व्हावी, तसंच तिचा वारसा मी जपतोय हे लक्षात रहावं, अशी इच्छा असल्याचं प्रतीकनं म्हटलं आहे.

या विषयी बोलताना प्रतीक म्हणाला की, "आईला आपल्यातून जाऊन यावर्षी 37 वर्षे होतील पण, तिला आजही कुणीच विसलेलं नाही. तिला मी विस्मतीत जाऊ देणार नाही. स्मिता पाटील माझ्या या नवीन नावाच्या माध्यमातून कायम आपल्यात असतील." स्मिता पाटील आणि राज बब्बत यांनी लग्नानंतर 1986 साली प्रतीकला जन्म दिला. प्रतीकचं वडील राज बब्बर यांच्याशी असलेलं नात फारसं चांगलं नसल्यानं त्याच्या आईच्या आई वडिलांनी त्याचा सांभाळ केला आहे. त्याने 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून अभिनेता इमरान खान आणि जिनीलिया डिसूझा यांच्याबरोबर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in