"जेव्हा अशोकमामा...", महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापची ती पोस्ट व्हायरल

भारतीय सिनेसृष्टीत प्रसिद्ध असणारे अभिनेते अशोक सराफ यांच्याबद्दल 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली
"जेव्हा अशोकमामा...", महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापची ती पोस्ट व्हायरल

गेली अनेक दशके मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट क्षेत्र गाजवणारे अशोक सराफ यांना प्रत्येक कलाकार आदर्श मानतो. त्यांनी आजवर अनेक चित्रपट, नाटके आणि मालिका केल्या आहेत. नुकतेच झालेल्या झी चित्र गौरव पुरस्कारामध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, अशोक सराफ यांची कौतुकच थाप म्हणजे नव्या कलाकारांसाठी मोठा आशीर्वाद असतो. अशामध्ये, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता पृथ्वीक प्रतापने अशोक सराफ यांच्यासोबतचाएक फोटो शेअर केला आहे. याखाली त्याने लिहिले आहे की, "अशोक मामांना आपले नाव माहित असणे, त्यांनी आपल्या कामाचे कौतुक करणे आणि त्यामध्ये आपल्या कामासाठी संपूर्ण टीमला त्यांच्यासमोर पुरस्कार मिळणे, हे सारे स्वप्नवत आहे." असे म्हणत त्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. एकांकिका आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या पृथ्वीकची 'महाराष्टाची हास्यजत्रा'मध्ये निवड झाली आणि त्याचे नशीबच बदलेले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in