अभिनेते रवींद्र महाजनी यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस तपासात व्यक्त होत आहे
अभिनेते रवींद्र महाजनी यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठीतील प्रतिभावान अभिनेते रवींद्र महाजनी यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

शुक्रवारी रवींद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी तळेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रवींद्र महाजनी राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी पोलिसांना रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, हा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस तपासात व्यक्त होत आहे.

रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी मुंबईत राहतो. पोलिसांनी त्याला सर्व माहिती दिली आणि तो लगेच पुण्यात दाखल झाला. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. रवींद्र महाजनी यांच्या पार्थिवावर तळेगाव ग्रामीण रुग्णालयात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in