Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीला मिळाला नवीन होस्ट, महेश मांजरेकरांच्या जागी दिसणार 'हा' अभिनेता

Marathi Reality Show: 'बिग बॉस मराठी' चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Actor riteish deshmukh will be the new host of big boss marathi

Riteish Deshmukh: संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि JioCinema वर मराठीतला सुप्रसिध्द शो 'बिग बॉस मराठी' चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रसिकांचा आवडता, मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठ्ठा शो “बिग बॉस मराठी” या भव्यदिव्य कार्यक्रमाचे होस्टिंग नामवंत बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता , अवघ्या महाराष्ट्राचाच नाहीतर जगभरातील मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत असलेला “लय भारी” स्टार रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठी आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेयर केला आला असून त्यामध्ये बिग बॉसचा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टायलिश हिरो आणि रसिकांना ‘वेड’ लावणारा मराठमोळा मुलगा रितेश देशमुख देखील दिसत आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये रितेश देशमुखबरोबरच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझननी मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जगभर जोरदार चर्चा झाली. आता त्याच सर्वाधिक प्रसिध्द असलेल्या “बिग बॅास मराठी” च्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.

बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आता आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या आलिशान घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप्स अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

logo
marathi.freepressjournal.in