'अनुपमा' फेम अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन, ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ऋतुराज सिंह यांच्या अचानक निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा...
'अनुपमा' फेम अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन, ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'अनुपमा' या गाजलेल्या टीव्ही मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे सोमवारी रात्री हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

सिंह यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून स्वादुपिंडाशी संबंधित आजारांवर उपचार सुरू होते. “पोटाच्या काही समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. कार्डिअक अरेस्टमुळे रात्री १२.३० च्या सुमारास त्यांचे घरी निधन झाले,” असे ऋतुराज यांचे जवळचे मित्र अमित बहल यांनी पीटीआयला सांगितले.

ऋतुराज सिंग यांनी टेलिव्हिजन कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. १९८९ मध्ये त्यांनी 'इन विच ॲनी गिव्स इट दोज वन्स' या टीव्ही शोमधून पदार्पण केले. १९९३ मध्ये ते मुंबईत स्थायिक झाले आणि 'तोल मोल के बोल' या टीव्ही शोमधून होस्ट म्हणून करिअरला सुरुवात केल्यानंतर ते प्रसिद्ध झाले.

त्यानंतर त्यांनी 'रिश्ते', 'कुटुंब', 'कहानी घर घर की', 'सीआयडी', 'अदालत', 'दिया और बाती हम' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' यांसारख्या अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केले. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. टीव्ही व्यतिरिक्त ऋतुराज यांनी 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'सत्यमेव जयते 2' आणि 'यारियां' सारख्या चित्रपटांमध्ये आणि 'क्रिमिनल जस्टिस', 'बंदिश डाकू' आणि 'मेड इन हेवन' सारख्या वेब शोमध्येही काम केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in