सलमान खानने केला माझा शारीरिक छळ; एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप

सलमान खान मला सिगरेटचे चटके द्यायचा, लैंगिक शोषण करायचा असे गंभीर आरोप त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केले आहेत
सलमान खानने केला माझा शारीरिक छळ; एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि वाद, हे नाते आपल्यासाठी काही नवीन नाही. तो अनेकदा चित्रपटांपेक्षा अधिक इतर गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत राहतो. त्याची प्रेमप्रकरणे, त्याचे वागणे यामुळे तो अनेकदा वादात अडकला आहे. मात्र, यावेळी सलमान खानवर लैगिक शोषण आणि शारीरिक छळ यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप करणारी त्यांची एक्स गर्लफ्रेंड आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री आणि सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमा अलीने त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने सलमानवर लैंगिक शोषण आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री सोमा अली ही वयाच्या १५व्या वर्षांपासून सलमानची चाहती होती. १९९३ दरम्यान सोमी आणि सलमान यादोघांचे प्रेमसंबंध होते. नंतर काही कारणास्तव दोघांमध्ये खटके उडायला लागले आणि दोघेही वेगळे झाले. त्यावेळी 'सलमान हा मला मारहाण करत होता' असा आरोप तिने त्यावेळीही केला होता.

पुन्हा एकदा पोस्ट करत तिने सलमानवर गंभीर आरोप केले. तिने सलमानचे नाव न घेता लिहले होते की, तो मला सिगारेटचे चटके द्यायचा. त्याने माझे शारीरिक आणि लैंगिक शोषणदेखील केले आहे. सलमान खानला महिलांनी डोक्यावर घेणे थांबवायला हवे." असे आवाहन तिने केले आहे. तिच्या या पोस्टमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे. सध्या सोशल मीडियावर याविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. अद्याप यावर सलमान खानकडून कुठलेही व्यक्तव्य आले नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in