
अभिनेता विकी कौशल हा त्याच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या सिनेमात विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान हे प्रमुख भूमीकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. याच निमित्ताने विकी कौशल हा नुकताच ठाण्यात आला होता. यावेळी त्याने ठाणेकरांसोबत मराठीतून संवाद साधला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी देखील त्या ट्रेलरला चांगलीच पसंती दिली. त्यानंतर अभिनेता विकी कौशलच्या वाढदिवशी या सिनेमातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी कोशलने ठाण्यात हजेरी लावली होती.
विकी या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ठाण्यातील कोरम मॉलमध्ये आला होता. यावेळचा त्याचा व्हिडिओ हा चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी विकीला बघण्यासाठी मॉलमधील त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. त्याची एन्ट्री होतात चाहत्यांनी त्याच्या सोबत हात मिळवण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, सही घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. यावेळी विकीने देखील चाहत्यांशी दिसखुलासपणे गप्पा मारल्या. यावेळी विकीच्या काही खास चाहत्यांना स्टेजवर विकीच्या बाजूला उभ राहुन फोटो काढण्याची संधी मिळाली. यादरम्यान, एक महिला आपल्या लहान मुलीला घेऊन स्टेजवर आली, तेव्हा विकी त्यांच्याकडे पाहून मराठीत म्हणाला, "काय कसं काय?" अभिनेता विकी कौशलच्या तोंडून मराठी शब्द ऐकताच सर्वजण आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले.
विकी कौशलचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी त्याच्या दिलखुलासपणाचे तसेच त्याच्या मराठीत संवाद साधण्याचे कौतुक करत आहेत. विकी कौशल आणि सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' हा आगामी सिनेमा 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.