कलाकार जेव्हा पत्रकार होतात...

'या' कलाकारांनी केली चमकदार कामगिरी
कलाकार जेव्हा पत्रकार होतात...

न्यूजचॅनल किंवा पत्रकारांचं जग आता मनोरंजन क्षेत्रालाही वारंवार खुणावतंय असं दिसतंय. नुकत्याच लोकप्रिय झालेल्या 'स्कूप' या सिरीजमुळे पत्रकारांचं विश्व पुन्हा एकदा समोर आलं. याआधीही अनेक प्रतिभावान कलाकारांनी पत्रकाराच्या भूमिका उत्तम रित्या साकारल्या आहेत.

" स्कूप" मध्ये करिश्मा तन्ना :

"स्कूप" या उत्कृष्ट वेबसिरीजमध्ये एक धाडसी पत्रकार जागृती पाठकने सगळ्यांची मनं जिंकली. अभिनेत्री करिश्मा तन्नाने जागृती ची भूमिका अनोख्या पद्धतीने साकारून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. जिग्ना व्होरा या रिअल लाईफ पत्रकार महिलेच्या जीवनावरून ही कहाणी प्रेरित आहे.

"

धमाका" मधला कार्तिक आर्यन :

कार्तिक आर्यनने 'धमाका' मध्ये एका न्यूज अँकरची भूमिका साकारली होती. सगळ्यांना एका रोलरकोस्टर राईडवर त्याचा हा अभिनय घेऊन जातो. अर्जुन पाठक हा न्यूज अँकर बनलेल्या कार्तिकने दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.

"

नो वन किल्ड जेसिका" मधील राणी मुखर्जी

"नो वन किल्ड जेसिका" या चित्रपटात राणी मुखर्जीने मीरा या शोधपत्रकाराच्या भूमिकेत उत्तम परफॉर्मन्स दिला. राणी मुखर्जीच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. याचसोबत न्यूज चँनलचा पडद्यामागचा चेहराही यात पाहायला मिळाला.

" जलसा" मध्ये विद्या बालन

माया मेननच्या भूमिकेत विद्या बालनने ‘जलसा’ मधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन तर जिंकली पण एक उत्तम पत्रकार म्हणून तिचा दाखवलेला प्रवास लक्षात राहणारा होता.

एकंदरच आपल्या चमकदार अभिनयाने कलाकारांनी या भूमिकांवर छाप पाडली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in