काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री अंजली अरोराचा एक कथित MMS समोर आला होता. यानंतर ती मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. तिने आता अनेक मीडिया पोर्टल आणि यूट्यूब चॅनेलवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तिचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या अनेक पोर्टल्सवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. यावेळी तिने या माध्यमांवर आपली प्रतिमा डागाळण्याचा आरोप केला आहे.
अंजलीने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले असून तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंजलीने आधीच एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी आता या प्रकरणाचा अधिकृत तपास सुरू केला आहे.
काय आहे प्रकरण?
ऑगस्ट 2022 मध्ये व्हिडिओ प्रसारित झाला होता. या व्हिडिओमध्ये एक महिला आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होती. अनेक पोर्टल्सने आणि यूट्यूब चॅनल्सने ती महिला अंजली अरोरा असल्याचा दावा केला होता. तर, मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला असल्याचे सांगत अंजलीने यावर स्पष्टीकरण दिले होते.
कंगना राणौतने होस्ट केलेल्या 'लॉक-अप' या रिअॅलिटी शोमध्ये काम केल्यानंतर अंजली अरोरा प्रकाश झोतात आली होती. या शोमध्ये तिचा स्पर्धक असलेल्या मुनावर फारुकीसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.