आमचे देवही दारू... ; केतकी चितळेंच्या विधानाने मोठा वाद

अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून सतत चर्चेत असते, यावेळीही तिने देवांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले
आमचे देवही दारू... ; केतकी चितळेंच्या विधानाने मोठा वाद

मराठीतील अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमी तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टवर केलेल्या विधानांमुळे चर्चेत असते. केतकीने ३१ जानेवारीच्या रात्री चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर टाकला. यावरून तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले. या व्हिडिओमध्ये तिच्या हातामध्ये दारूचा ग्लास दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत टीका केली. टीका करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देत असताना तिने एक वादग्रस्त कमेंट केली.

एका युझरने केतकी चितळेच्या व्हिडीओवर कमेंट केली होती की, "वाह दीदी... लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचे" अशा शब्दांमध्ये त्याने टीका केली. यावर उत्तर देताना तिने लिहिले की, "मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देवही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसंच काही शंकाराच्या मंदिरातही. स्वत:ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते आणि सांगते. फरक शिका." तिच्या या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला असून अनेकांनी तिच्या या कमेंटवर नाराजी दर्शवली.

logo
marathi.freepressjournal.in