अभिनेत्री प्राजक्ता माळीने केला वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा म्हणाली माझं ब्रेकअप ...

यावेळेस तिने तिच्या रिलेशनशीपबाबत धक्कादायक बाब सांगितली
अभिनेत्री प्राजक्ता माळीने केला वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा म्हणाली माझं ब्रेकअप ...

प्राजक्ता माळी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगितली. प्राजक्ताची नुकतीच रानबाजार ही वेबसीरिज ओटीटी वर रिलीज झाली. प्रेक्षकांनी या सीरिजचे व प्राजक्ताच्या भुमिकेचे खुप कौतुक केले. या सीरिजमुळे प्राजक्ता अनेकदा चर्चेत आली. पण या आधी प्राजक्ता कधीही तिच्या रिलेशनशीपबाबत बोलली नाही. परंतु यावेळेस तिने तिच्या रिलेशनशीपबाबत धक्कादायक बाब सांगितली.

वाय हा चित्रपट काही दिवसांपासुन सातत्याने चर्चेत आहे. अजित सुर्यकांत वाडीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे. येत्या २४ जुनला चित्रपट रिलीज होणार असुन पोस्टर,टीझर,ट्रेलर यामुळे चित्रपटाची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून प्राजक्ता माळी महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसार माध्यमाशी बोलताना प्राजक्ताने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. वाय चित्रपटाच्या शूटींगदरम्यान प्राजक्ताचा ब्रेकअप झाला होता असे तिने मुलाखतीत सांगितले.

या चित्रपटामध्ये माझी भूमिका लहान आहे पण तितकीच महत्वपुर्ण आहे असे ती म्हणाली. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या. माझे ब्रेकअप झाले होते. मी कुठे आहे काय करते आहे याची काहीच कल्पना मला नव्हती. या शूटींगच्या वेळी घडलेल्या खुप गोष्टी मला नीट आठवत नाही असेही प्राजक्ताने सांगितले.

चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी दिग्दर्शक मला आठवण करुन देत होते तु हा सीन करताना पडली होतीस. इथे तु असं बोलली होतीस, तुला आठवत आहे का? त्यावेळी मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना फक्त हो बोलत होती. परंतु मला काहीच आठवत नव्हत. मी माझ्या विचारात गुंतली होती असे तिने सांगितले.

माझ्या आयुष्यात एवढं घडल्यानंतर मी जेव्हा वाय चित्रपट पाहिला त्यावेळी मी खुश होती. हा चित्रपट निवडून योग्य निर्णय मी घेतला याची खात्री झाली. प्रेक्षक हा चित्रपट बघून नक्की खुश होतील. मी या चित्रपटाचा एक भाग आहे याचा मला आनंद आहे.

logo
marathi.freepressjournal.in