actress Rakhi Sawant Hospitalised In Mumbai Due To Heart Problem
@UmairSandu/ X

बोटात ऑक्सिमीटर, हातावर सलाईन, 'बॉलिवूडची ड्रामा क्वीन' राखी सावंतचे रुग्णालयातले फोटो Viral

Rakhi Sawant Hospitalised: राखीच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक होती आणि त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
Published on

Rakhi Sawant Heart Problem: बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस फेम राखी सावंतला गंभीर हृदयविकारामुळे मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील अभिनेत्रीचे फोटो आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, राखीने सांगितले की, तिला पुढील ५-६ दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तिने असेही सांगितले की ती आता सध्या जास्त तपशील सांगू शकत नाही. "मला थोडा वेळ हवा आहे" असं सांगत तिने मीडिया आणि चाहत्यांकडून गोपनीयतेचीही विनंती केली. राखीच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक होती आणि त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

राखी सावंत ही सोमवारी शहरात नेहमीप्रमाणे पापाराझींसोबत बोलताना दिसली. यावेळी ती मुंबईत रिमझिम पाऊसाचा आनंद घेत कॅमेऱ्यांसमोर नाचतानाही दिसली. पण अचानक मंगळवारी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पापाराझी विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राखी सावंतचे काही फोटो शेअर केले आहेत, जे हॉस्पिटलमधील आहेत. या फोटोत आपण बघू शकतो की राखी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडली आहे. एका बोटाला ऑक्सिमीटर आणि तिला ग्लुकोज चढवलेले दिसत आहे. एका फोटोमध्ये नर्स तिचा बीपी तपासत असलेलं दिसत आहे.

राखी सावंत याआधीही अनेकदा रुग्णालयात दाखल झाली आहे. काही काळापूर्वी त्यांनी असेही सांगितले होते की तिच्या पोटात एक गाठ आहे ज्यासाठी ऑपरेशन करण्यात आले होते. हे ऑपरेशन ४ तास चालले. ही गाठ गर्भाशयाच्या अगदी वर होती.

logo
marathi.freepressjournal.in