Sushant Singh Rajput : अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसाठी एक खास व्हिडिओ शेअर केला

रियाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या
Sushant Singh Rajput : अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसाठी एक खास व्हिडिओ शेअर केला

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे (Sushant Singh Rajput) निधन होऊन आज तीन वर्षे झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली जात आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. रियाने शेअर केलेल्या या व्हिडिओकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.

रियाने सुशांतसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत आणि रिया एकमेकांच्या जवळ बसलेले दिसत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला विश यू वीअर हे गाणे ऐकू येत आहे. रियाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रियावर काही गंभीर आरोप लावण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी रियाला ट्रोल केले होते. रिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in