प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या गाडीचा भीषण अपघात; डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला

प्रसिद्ध मालिकांमधून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या गाडीला दिली स्कुल बसने दिली धडक
प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या गाडीचा भीषण अपघात; डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला

छोट्या पडद्यावर भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकीयाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. बिग बॉस विजेती टीव्ही अभिनेत्री उर्वशी या अपघातामध्ये थोडक्यात बचावलाई असली तरीही तिला डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एका चित्रीकरणासाठी जात असताना एका स्कुल बसने तिच्या गाडीला धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्वशी ढोलकीया ही मीरा रोडमधील एका स्टुडिओमध्ये चित्रीकरणास जात होती. या दरम्यान एका स्कुल बसने तिच्या गाडीला जोरदार धडक दिली. सुदैवाने यामध्ये उर्वशी आणि तिचे सहकारी अगदी सुखरुप आहेत. यानंतर तिने स्कुलबसविरोधात पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केलेली नसल्याची माहितीही देण्यात आली. अपघाताबाबत ती म्हणाली की, हा केवळ एक अपघात होता. आपण एकदम सुखरुप असून काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला असल्याचे तिने सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in