ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंनी बांधली पुन्हा लग्नगाठ; म्हणाल्या...

मराठी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या या स्पेशल लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे
ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंनी बांधली पुन्हा लग्नगाठ; म्हणाल्या...

'मातीच्या चुली', 'पछाडलेला', 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' यांसारखे अनेक चित्रपट तर 'या गोजिरवाण्या घरात', 'आंबट गोड' सारख्या अनेक मालिकांमधून मराठी चित्रपट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या अभिनेत्री वंदना गुप्ते या सोशल मीडियावर चांगल्याच अ‍ॅक्टिव्ह असतात. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधत असल्याची पोस्ट केली आणि या पोस्टची चांगलीच चर्चा झाली. त्यांनी नुकताच लग्नाचा ५०वा वाढदिवस जोरदार साजरा केला.

५० वर्षांपूर्वी वंदना गुप्ते यांचा शिरीष गुप्ते यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. तर नुकतेच त्यांच्या लग्नाच्या ५० वर्षे पूर्ण झाली. यावेळी ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा छोटेखानी विवाह सोहळा संपन्न झाला. कुटुंबीयांच्या साक्षीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. सोशल मीडियावर यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट केली. "परदेशातून आमचे नातेवाईक आमच्या या लग्न सोहळ्यासाठी भारतात दाखल झाले. या खास दिवशी हे सगळे आमच्या आनंदात सहभागी झाले. त्यांनी घरीच लग्नाची तयारी केली कारण, आम्ही दोघांना ते अविस्मरणीय क्षण पुन्हा अनुभवायला मिळाले. सर्वाधिक आनंद याचा होता की, आमची मुले आमच्या लग्नाला हजर होती. आमच्या आनंदात सहभागी होऊन आमचा हा दिवस खास बनवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार." असे पोस्टमध्ये त्यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in